
कवि और कविता श्रृंखला में डॉ. प्रेरणा उबाळे की मराठी कविता “भाव मुके” …
■ भाव मुके – डॉ. प्रेरणा उबाळे
कुणास ठाऊक
भाव मुके की शब्द मुके ?
भाव जेव्हा वसती डोळ्यांत,
झिरपूनी उतरती हृदयात,
अन् तव शब्द येती ओठांत.
ओठांतून शब्द येई अर्थासवे पण
अर्थातून भाव न कळती सारे,
ओठांतून शब्दांची भाषा जरी होई,
भावांची भाषा परी हृदयीच राही.
डोळे बंद करून जेव्हा
ऐकू येते धडधड
हृदय लागते बोलू काही
जणू भावांचीच गुंफण सारी.
वाटते मला गुंफण खोलावी
अन् व्यक्त करावी गुंजन खरी.
पण शब्द पडती फिके
भाव अधिकच होती मुके.
हृदयाचे imitation करुनी मग शब्द
भावांस प्रकटनी अर्थातूनी तव
भावांची गुंफण गुंफितच जाई,
सारी किवाडे बंदच राही.
अंतरीचे घुसमटणे असेच घडे
राहती सदैव हे भाव मुके.
– डॉ. प्रेरणा उबाळे (12 जनवरी 2011)