मूळ कविता – थोडा बाकी है अभी … -अरुण प्रधान) ‘कवि और कविता’ श्रृंखला में डॉ. प्रेरणा उबाळे द्वारा अनुदित कविता “थोडं बाकी आहे अजून
(मूळ कविता – थोडा बाकी है अभी … -अरुण प्रधान) ‘कवि और कविता’ श्रृंखला में डॉ. प्रेरणा उबाळे द्वारा अनुदित कविता “थोडं बाकी आहे अजून” …
थोडं बाकी आहे अजून … – डॉ. प्रेरणा उबाळे
आज पुन्हा हृदय पिळवटून निघालंय 
तुझ्या दिलकश दुनियेत
पारखलं जातं कित्येकदा
आणि नाकारलं जातं
आयुष्यभर एक ओझं घेऊन
तुझ्या दिलकश दुनियेत
आज मनावर जखम झाली आहे
बोलणे इतके टोचले आहे
शब-ए-गम मिळाले आहेत
माझ्या मनाच्या भिंतींवर
पैवस्ता तुझ्या प्रेमाच्या अदा
त्या इच्छा आणि त्या आकांक्षाच्या फांद्या
ज्या ओढून तू
पारखले मी पैवस्ताला पूर्णत: …
आज पुन्हा हृदय पिळवटून निघाले आहे
पुन्हा परतायचंय मला
एकांतात,
नाही… एकांतातल्या गर्दीत परतायचंय
आता पारखलं जाणं
सुकून-ए-दिल तुडवला जाणं
माझ्या विश्वासाच्या अंगावर
तुझ्या संशयाच्या व्रणांनी
तुझ्या दिलकश दुनियेत
आज पुन्हा हृदय पिळवटून निघालंय…
वाहू दे रक्त असंच दस्तूर-ए-इश्कामध्ये
असं असतं का कुठं ?
हे काही रुचलं नाही
अजून चंद्राला सजवणं
थोडं बाकी आहे अजून…
आणि सूर्याला ओढून
पृथ्वीच्या जवळ आणणं
थोडं बाकी आहे अजून…
नवी गजल, शेर आणि गीत लिहिले जाणं
पृथ्वीच्या आकाशावर ताणलेले धुके
विचारांमध्ये मिसळलेले रंग सोबत आहेत
हिरवा, लाल, भगवा, निळा प्रत्येक हात आहे
भुकेची भाकरी आणि हातातलं काम
थोडं बाकी आहे अजून…..
आकाशाला चमकावणं
थोडं बाकी आहे अजून….
पृथ्वीच्या हातांना
आकाशाच्या हातांमध्ये हात घालणं
आणि
आकांक्षांच्या वाटा
शुष्क ताऱ्यांच्या जमिनीवर उतरणं
थोडं बाकी आहे अजून….
माझ्या हातात तुझा हात असणं
थोडं बाकी आहे अजून….
तुझ्या डोळ्यांमधील समुद्रात
प्रेम आणि विश्वासाची नाव उतरणं
थोडं बाकी होतं अजून….
माझ्या डोळ्यांच्या आणखी जवळ येणं
थोडं बाकी होतं अजून….
तुझ्या माझ्या स्वप्नांचं एक होणं
थोडं बाकी होतं अजून….
आपल्या मुठीत नियतीचं हसणं
थोडं बाकी होतं अजून….
……
तुझ्या दिलकश दुनियेत
आज पुन्हा हृदय पिळवटून निघालंय
थोडं बाकी आहे अजून ….
थोडं बाकी आहे अजून ….  (अनुवाद – डॉ. प्रेरणा उबाळे)
डॉ. प्रेरणा उबाळे (लेखिका, कवयित्री, अनुवादक, आलोचक, सहायक प्राध्यापक, हिंदी विभागाध्यक्षा, मॉडर्न कला, विज्ञान और वाणिज्य महाविद्यालय (स्वायत), शिवाजीनगर, पुणे-411005, महाराष्ट्र) @Dr.PreranaUbale

                                                        
                                                        
                                                        
                                                        
                                                        
                                                        
                                                        
                                                        
Mast
Mast poem
Chan