
‘कवि और कविता’ श्रृंखला में डॉ. प्रेरणा उबाळे द्वारा अनुदित कविता “तुझं असणं” …
(‘तुम्हारा होना’… मूल कवि-अरुण प्रधान), ‘कवि और कविता’ श्रृंखला में डॉ. प्रेरणा उबाळे द्वारा अनुदित कविता “तुझं असणं” …
तुझं असणं
तुझं असणं आमचं असणं आहे
जेव्हा तू पहिल्यांदा आला होतास
जेव्हा मी आकार घेतला होता आणि
पृथ्वीवर येऊन तू उदात्त झालास
माझ्या असण्याला
तू पहिली अट झालास
माझं आकाश होणं तुझं असणं होतं
आकाशाची इच्छा
जमिनीवर असणे
आयुष्य भटकण्याच्या थांब्याला
जेव्हा तू पहिली अट झालास
पृथ्वीवर पडलेल्या बियांची हिरवळ
आणि आकाशाचा साकार होणं
तुझं असणं आहे
तुझं असणं माझं असणं आहे
तुझं असणं क्षितिज असणं आहे
हवेचे ढग होऊन जाणे
तू पहिली अट होतास
जेव्हा वसंताचं असणं
तू झाला होतास
जेव्हा वसंताचं असणं तू झालास
जंगलांमध्ये वणवे पेटले होते
पळसाची फुले लगडून गेली होती
रोम-रोमात आणि
तू जंगलामध्ये पळस झाला होतास
जंगलातली हवा सुगंधित झाली होती
तू माझा सुगंध झाला होतास
तुझं असणं आमचं असणं आहे
तू ढग झाला होतास
मोडून गेलो होतो मी पृथ्वीवर
आणि तू बियांच्या प्रेमात
व्यापला होतास अस्त-व्यस्त
बियांचे उगवून येणं…
पृथ्वीवर बियांचे आयुष्य…
तू पहिली अट झाला होतास
तुझं असणं आयुष्य असणं आहे
तुझं असणं माझं असणं आहे
तुझं असणं आमचं असणं आहे. (अनुवाद – डॉ. प्रेरणा उबाळे)
डॉ. प्रेरणा उबाळे (लेखिका, कवयित्री, अनुवादक, आलोचक, सहायक प्राध्यापक, हिंदी विभागाध्यक्षा, मॉडर्न कला, विज्ञान और वाणिज्य महाविद्यालय (स्वायत), शिवाजीनगर, पुणे-411005, महाराष्ट्र) @Dr.PreranaUbale